---------------------------------------------------------
*विभाग : विदर्भ*
*दि. २८/०२/२०१९*
-------------------------------------------------------------
*नागपूरात दक्षिण एक्सप्रेसमधून २५ किलो गांजा जप्त*
नागपूर -* आरपीएफच्या जवानांनी नागपूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य कोचमधून २५ किलो गांजा जप्त केलाआहे. याआधीही अनेक वेळा आरपीएफच्या जवानांनी दक्षिण एक्स्प्रेसमधून गांजा पकडलेला आहे.
दक्षिण एक्स्प्रेस ही गाडी नेहमीच आरपीएफच्या रडारवर राहिलेली आहे. जवानांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य कोचमध्ये सर्च केला असता त्याठिकाणी २ बेवारस बॅग आढळल्या. त्यावर कुणीही दावा करत नसल्याने जवानांनी त्या बॅगमध्ये असलेले साहित्य तपासण्याकरिता बॅग उघडून बघितली. तेव्हा त्यांना बॅगमध्ये गांजा भरलेले पाकिट आढळून आले. प्रत्येक पाकिटाचे वजन २ किलो असून एकूण १३ पाकिट जप्त करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
-----------------------------------------------------------

Comments
Post a Comment