D LIGHT NEWS
-------------------------------------------
विभाग : विदर्भ अमरावती जिल्हा
दि.०८ /०३/२०१९
-------------------------------------------------------------
शिक्षण मंत्र्याच्या आश्वासनानंतर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा संप मागे
- मागण्या मंजूर झाल्याने कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद
अमरावती/प्रतिनिधी
:-विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आज मागे घेतला. शिक्षण मंत्र्याच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाने ५ मार्चपासून सुरु असलेला बेमुदत संप मागे घेत असल्याची घोषणा केली. मागण्या मंजूर णाल्याने अमरावती जिल्ह्यातील कर्मचार्यांनी आनंद व्यक्त करुन हा संघटनेच्या एकतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. सर्वच मागण्या मंजूर झाल्यामुळे कर्मचाNयांनी संघटनेच्या पदाधिकाNयांना व सहकार्य करणाNयांना धन्यवाद दिले.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी ५ मार्च २०१९ पासून बेमु१दत संपामध्ये सहभागी झाले होते. आज ७ मार्च रोजी दुपारी २.३० वा. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.विनोदजी तावडे यांच्या दालनात महासंघाच्या पदाधिकाNयांसमवेत सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये ७.१२.२०१८ व १६.०२.२०१९ रोजीच्या शासन निर्णयाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून नियमित करण्याबाबत संबंधित अधिकाNयांना आदेश देण्यात आले. तसेच तोपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना दुसाऱ्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे तोपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे तो तसाच चालू ठेवण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालक सर्व विभागीय सहसंचालकांना देण्यात आल्या.
संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर आकसाने कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे ५ मार्च २०१९ पासून पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्यात आल्याचे कर्मचारी महासंघाच्यावतीने कळविण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी महासंघाचे सरचिटणीस डॉ.आर.बी.सिंह, अध्यक्ष व्ही.एस.निकम, कार्याध्यक्ष राजा बढे, कामठे, विभागीय सरचिटणीस सुदाम मुगल यांनी परिश्रम घेतले. अमरावती जिल्ह्यात संप यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बारस्कर, जिल्हाध्यक्ष प्रशांत देशमुख, सचिव प्रफुल्ल घवळे यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष प्रमोद धांडे, अलका थोरात, कोषाध्यक्ष राजू अंबाडकर, गणेश काटकपुरे, अनंत सोमवंशी, संजय सालबर्डे, मनिष गुढे, विनोद बुरे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. संपामध्ये अमरावती शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय, के.एल. महाविद्यालय, डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, म.ज्योतिबा फुले महाविद्यालय, आरडीआयके महाविद्यालय, दत्तात्रय पुसतकर महाविद्यालय आदि महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते. अमरावती जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांनी संपात यशस्वी सहभाग घेतल्यामुळे महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर झाल्या.
--------------------------------------------
नाव:- गणेश प्रधान
पद:-क्राईम रिपोटर महाराष्ट्र
वेबसाईट:-www.dlightnews .com

Comments
Post a Comment