🌎D LIGHT NEWS 🌍
-------------------------------------------
*विभाग : विदर्भ* नागपूर जिल्हा
*दि. १३/०३/२०१९*
-------------------------------------------------------------
*दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना शस्त्रांसह अटक*
नागपूर :-
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना शस्त्रांसह अटक करण्यात पाचपावली पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून तलवार आणि चाकूसह काही इतरही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. इंद्रजीत उर्फ इंदल बेलपारधी, नामदेव बाळकृष्ण निनावे, सुखदेव निखारे, रोहित नारकर आणि मनीष वर्मा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अनंतराव बडकर हे आपल्या स्टाफसह रात्र गस्तीवर होते. यावेळी त्यांना मोतीबाग परिसरातील शिवमंदिराच्या मागील गल्लीत काही लोक संशयास्पदरित्या अंधारात बसून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला आणि या आरोपींना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि एक तलवार यासह सह दरोड्यात उपयोगी येणारे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
------------------------------------------- डी लाईट न्युज
नाव:- गणेश प्रधान सह ज्योतिबा वाघमारे
पद:- क्राईम रिपोटर महाराष्ट्र
वेबसाईट:-www.dlightnews. Com

Comments
Post a Comment