जंगली वनस्पती ची लागवड शेतामध्ये करून स्वतः सहीत अनेक शेतकरी बांधवांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करता येते याची शिकवण पुसद सहीत आजुबाजुच्या परिसरातील शेतकरी बांधवांना पहिल्यांदा करून देणारे व्यक्तिमत्त्व आदरणीय जनार्दन जाधव काका श्री. यांची शेती पुसद तालुक्यातील वरूड या गावाजवळील जाधव वाडी येथे आहे..
आदरणीय जनार्दन काका श्री यांच वय सध्या 76 वर्ष आहे.. त्यांनी सर्व प्रथम त्यांच्या शेतामध्ये करवंद या जंगली फळांची लागवड त्यांच्या शेतामध्ये केली होती..
आता सध्या आदरणीय जनार्दन काका श्री यांच्या शेतामध्ये,, आंबा ,, पेरू आणि लिंबू 🍋 हे फळपीक उपलब्ध आहे.. त्यांच्या शेतातील करवंद दिल्ली येथील व्यापारी स्वतः मजुर लावून तोडणी करून नेतात.. अतिशय नियोजनबद्ध शेती करणार्या आदरणीय जनार्दन काका जाधव यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद आज मला त्यांच्या शेतात जाऊन घेता आले हे माझं सौभाग्य आहे..
Comments
Post a Comment